पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा हे 1 लाख 83 हजार 306 मतांनी विजय झाले आहेत. भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांना 6 लाख 01 हजार 244 इतकी मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारती कामडी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 इतकी मतं मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना 2 लाख 54 हजार 517 इतकी मत मिळाली. 2024 च्या लोकसभा निवडूकीत एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत 23 हजार 385 मतदारांनी नोटा ला पसंती दिली. दरम्यान यावेळी भाजपच्या कार्यकर्त्या मध्ये आनंदाचं वातावरण होत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.