पालघर : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त पालघर शहरात किल्ले रायगडचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. जो आज पालघर मध्ये नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. नागरिकांना तसचं युवांना शिवाजी महाराज्यांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला होता. यावेळी पालघरच्या राम मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. आणि त्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक देखील करण्यात आला. त्याचबरोबर हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज्यांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्याभिषेक करण्याची सुविधा करण्यात आली आहे.
पर्यावरण संरक्षणचा चिमुकल्यांचा संकल्प, बनवले 117287 सीड बॉल……
राज्याभिषेक सोहळ्या निमित्त साकारण्यात आलेला हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे येत आहेत. त्याचबरोबर तरुण तरुणी देखील या ठिकाणी हे दृश्य पाहण्यसाठी मोठ्या संख्येनं येत आहेत. या देखावा आजपासून तीन दिवस नागरिकांना पाहण्यसाठी ठेवण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून किल्ले रायगडचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हा देखावा पालघर शहरात साकारण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा निमित्त पालघर मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.