पालघर : कोकण विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट मध्ये, विक्रमगड आणि नालासोपारा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.
मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट मध्ये आयोजित बैठकीत बोलताना ते म्हणाले की, निरंजन डावखरे यांच्या विजयाची जबाबदारी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी घ्यावी.
पहा व्हिडीओ …..
तसचं यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, आपल्या सीट कमी झाल्या,यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचलं. त्यांनी मागासवर्गीय नागरिकांना संभ्रमित केलं की, जर मोदी सरकार आलं तर ते संविधान बदलेल. आदिवासी समाजाला पेसा कायद्या बाबत त्यांनी संभ्रमित केलं. जातीपाती मध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही त्यांनी केलं.बावनकुळे म्हणाले की, जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर पहिल्यांदा मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पडतील. त्यांना मत देणे म्हणजे पुढचे पाच वर्ष मोदी सरकारच्या योजना बंद पाडणे. मोदींना बदनाम करणे, त्यांच्या योजना बंद पाडणे त्यांच षडयंत्र आहे.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या लोकांनी म्हटलं होत की, चार तारीख झाल्यानंतर पाच तारखेला आम्ही महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ. आता लोक वाट बघत आहेत. खोटं बोलून त्यांनी मते घेतली. त्याचा बदला जनता विधानसभेत घेतल्याशिवाय राहणार नाही.