पालघर : पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा, देहर्जा नदी ओसंडून वाहत आहेत. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले. मनोर – वाडा भिवंडी रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसचं पालघर – केळवे या परिसरातील ही अनेक छोटे रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता.
पहा व्हिडीओ …..
बोईसर, धनानीनगर मधल्या अनेक सखल भागात पाणी साचल्याने इथले रस्ते पाण्याखाली गेले होते. तर अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे नाल्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होत. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड कोलमडून पडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. सतत होणारा पाऊस आणि त्यात अनेक भागातला वीजपुरवठा ही रात्रीपासून खंडित झाला आहे. या पावसाचा परिणाम डहाणू उपनगरीय लोकल सेवेवर सुद्धा झालेला दिसून आला. त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्या उशिराने धावत होत्या. हवामान विभागाकडून आज पालघर जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 72.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.