पालघर : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बाल हक्क आयोग ( Maharashtra State Commission for Protection of Child Rights ) आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत प्रलंबीत प्रकरणांची सुनावणी आणि आढावा बैठक रविवारी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यलयात संपन्न झाली. आयोगाच्या बैठकीत सकाळच्या सत्रात जिल्ह्यातल्या प्रलंबीत प्रकणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित नागरीक आणि शासकीय विभागांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांचे समाधान तसचं आवश्यक त्या केसेस मध्ये सुचना आणि त्यांचे अहवाल आयोगाकडे सादर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
ऑर्किड फुल शेतीतून मिळवत आहेत भरघोस उत्पन्न…………..
दुपारच्या सत्रात जिल्हातल्या वेगवगळ्या विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मलिनाथ कांबळे हे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून सदस्य, विधी सल्लागार, परिवीक्षा अधिकारी, कनिष्ठ काळजी वाहक व कामगार विभाग, पोलीस विभाग, विशेष बाल पोलीस युनिटचे अधिकारी, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास ICDS विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग जव्हार, समाज कल्याण विभाग, जि.प., पोलीस अधिक्षक कार्यालय प्रतिनिधी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, सदस्य, माजी बाल कल्याण समिती अध्यक्ष, बालगृहे करुणा वेलफेअर, गीरीवनवासी बालगृह, रेस्क्यु फांउडेशन बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष कर्मचारी, चाईल्ड लाईन युनिट कर्मचारी आदी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित विभागांचा आयोगाच्या सदस्यांनी कामकाज आढावा, जिल्हातल्या कार्यवाही, अडचणी, नवीन उपक्रम आदी बाबत माहिती घेतली. उपस्थित विभागांना आपापल्या विभागा संबधीत योजना, कायदे याबाबत जनजागृती, प्रसार-प्रसिध्दी करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगच्या बाल हक्क आयोग आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत 22 प्रलंबीत प्रकरणांची सुनावणी आयोगाकडून घेण्यात आली.