पालघर : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून ( Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation ) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ( Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Government Scheme) राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन देण्यात येणार आहे. शासनाकडून शैक्षणिक पात्रतेनुसार १२ वी पास असलेल्या प्रशिक्षणार्थीना ६ हजार, आयटीआय किंवा पदवीका पास असलेल्या प्रशिक्षणार्थीना ८ हजार आणि पदवीधर/पदय्युत्तर प्रशिक्षणार्थीना १० हजार असं विद्यावेतन दिलं जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ महिन्यांचा असणार आहे.
पालघर जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळां मधल्या विद्यार्थ्याना विषबाधा
त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या १२ वी, आयटीआय/पदवीका, पदवीधर/पदव्युत्तर अशा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून 12 ऑगस्ट ला पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातल्या प्रशासकीय इमारत ब मध्ये On The Spot Selection Placement Drive चं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवारांना https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करता येईल.