पालघर : 14 ऑगस्ट 1942 च्या चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातल्या पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं होत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे आज देखील 14 ऑगस्ट हा दिवस इथं हुतात्मा दिनाच्या रुपात साजरा करण्यात आला. त्या क्रांतिवीरांना श्रद्धांजली देण्यासाठी तसचं पुण्यस्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व अधिकारी वर्ग, पोलीस प्रशासन, शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्यासंख्येनं उपस्थित होते. आजच्या दिवशी पालघर मधल्या सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सांगण्यात येत की, 14 ऑगस्ट 1942 साली देशाच्या स्वातंत्र्याला घेऊन पालघर च्या तहसील कार्यालयावर ब्रिटिश राजवटी विरोधात चोख बंदोबस्त असताना देखील चले जाव चा मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चातपालघर, सातपाटी, मुरबे, नांदगाव, सालवड, तारापूर, घिवली, वडराई, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोर, आणि सफाळ्या सह आसपासच्या क्षेत्रातले कैक हजारो लोकं करा किंवा मरा, ब्रिटिशों भारत छोडो आदी नारे देत सहभागी झाले होते. ब्रिटिश पोलिसांनी राम मंदिरा जवळ या मोर्च्याला अडविण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावली. मात्र तरी देखील ब्रिटिश पोलीस ह्या मोर्च्यास अडविण्यास असमर्थ ठरल्यानं अखेर त्यांनी मोर्चेकऱ्यांवर गोळीबार करणं सुरू केलं.
आणि त्या गोळीबारात हुतात्मा चौकाजवळ पालघर चे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, सालवड चे सुकुर गोविंद मोरे, सातपाटी चे काशीनाथ हरी पागधरे, मुरबे चे रामचंद्र माधव चुरी आणि नांदगाव चे गोविंद गणेश ठाकुर या पाच क्रांतिकारकांना 14 ऑगस्ट 1942 साली दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी हौतात्म्य प्राप्त झालं.
पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेकडे जाताना केवळ दहा पावलांच्या अंतरावर जिथं हे सर्व क्रांतिकारी शाहिद झाले होते त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ एक हुतात्मा स्तंभ बनवण्यात आला आहे. त्या शुरुवीरांच्या बलिदानाला आठवत दरवर्षी 14 ऑगस्ट ला पालघर मध्ये असलेल्या ( पाचबत्ती चौक ) हुतात्मा स्तंभावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांकडून, नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून, व्यापाऱ्यांकडून, शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून, पालघर आणि जवळपासच्या नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते.