पालघर : पालघर मध्ये पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाढवण बंदराच्या विरोधात असलेल्या लोकांनी एकत्र येवून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जेएनपीएची अंत्ययात्रा काढून आपला विरोध दर्शवला.
यावेळी मच्छीमारांनी आपल्या मासेमारीच्या बोटींवर काळे फुगे बांधून तसचं हाताला काळ्या पट्ट्या बांधून समुद्रात बोटींची रैली काढून वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा विरोध केला. या होत असलेल्या विरोधामुळे काही ठिकाणी शिवसेना उध्दव गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कार्यक्रम संपल्या नंतर त्यांना सोडण्यात आलं.