विद्यार्थिनींना स्वसंरक्षणा सोबतच दुर्बलांचे हि संरक्षण करता आले पाहिजे – डॉ.किरण सावे
पालघर : देशात महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता आता पालघर जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजां मध्ये मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महिला विकास कक्ष, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत.
आमच्या श्रापाने तुमची सरकार पडेल…..
यावेळी मुलींनी स्वसंरक्षणासाठी काय केले पाहिजे याबाबत ख्यातनाम कराटे प्रशिक्षक राजेश पाटील यांनी मुलींना अत्यंत्य तंत्रशुद्ध पद्धतीने काही ट्रिक्स प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितल्या. एखाद्या कठीण समयी आपण असामाजिक तत्त्वांचा, गुंडांचा सामना कसा करावा याबाबत ही त्यांनी प्रात्यक्षिके दाखवून मुलींना धाडसी बनविण्याचा प्रयत्न केला.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जवळपास २०० विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. यापुढे महिला विकास कक्षाच्या माध्यमातून दर महिन्याला २०० ते २५० मुलींना कराटे प्रशिक्षण देवून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेला संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले कि, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी महिला नैसर्गिकदृष्टया सक्षमच आहेत, परंतु जिद्द, धाडस आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या सहाय्याने प्रत्येक मुलगी स्वतःच्या रक्षणासोबतच इतरही दुर्बलांचे रक्षण करू शकते.