पालघर : क्षयरोगाTB पासून बचाव होण्यासाठी बी.सी.जी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. लस ही सर्वात सुरक्षित लस असल्यानं लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासुन बचाव होतो. मात्र सद्यस्थितीत बऱ्याच देशांत प्रौढांना होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बी.सी.जी लसींचा वापर होत आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यात ही आरोग्य विभागाकडून प्रौढांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.
आमच्या श्रापाने तुमची सरकार पडेल……
भारतात या पुर्वीच गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये या लसीचा वापर प्रौढां मधल्या क्षयरोग प्रतिबंधासाठी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही ठराविक ग्रामीण जिल्ह्यात आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रौढांना बी.सी.जी लस सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी प्रौढां मधले काही गट ज्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना प्रथमतः ही लस देण्यात येणार आहे.
यांना दिली जाईल लस :
मागील ०५ वर्षा पुर्वीचे क्षयरुग्ण
मागील ०३ वर्षातील क्षयरोग रुग्णांचे सहवासित
६० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक
१८ वर्षावरील परंतु कुपोषित किंवा BMI 18 किंवा त्या पेक्षा कमी
१८ वर्षावरील धुम्रपान करणारे प्रौढ
१८ वर्षावरील मधुमेहाचे रुग्ण
पालघर जिल्ह्यात बी.सी.जी लस देण्यासाठी आशा कार्यकर्त्यां कडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आलं असुन त्यात २,७३,८७८ अपेक्षित नागरिकांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यापैकी १,४०,०२६ नागरिकांनी लस घेण्यासाठी संमती दिली आहे. लस घेण्यासाठी संमती देणाऱ्या नागरीकांचं ही लस देण्यात येणार आहे.
हि लस देण्यासाठी गावा-गावांत, उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे. या लसीकरण सत्रासाठी आधारकार्ड किंवा पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.