पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. तसचं यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान विसर्जन स्थळांवर जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या विसर्जन स्थळांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत ज्यातून खतनिर्मिती केली जाणार आहे.
बहुचर्चित वाढवण बंदराचा मार्ग अखेर मोकळा, पालघर मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
मागील वर्षी महापालिकेकडून विसर्जनाच्या ६५ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आलं होत. ज्यामुळे मागील वर्षी वसई-विरार महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अव्वल ठरली होती.
बंद दगड खाणीतील विसर्जनासाठी इलेक्ट्रिक कन्व्हेअर बेल्ट :
बंद दगड खाणीतील पाण्यात विसर्जन करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते याशिवाय वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून यंदा महापालिकेकडून इलेक्ट्रिक कन्व्हेअर बेल्टचा वापर केला जाणार आहे. यामुळे गणेश मूर्तीचा विसर्जनाचा वेग वाढणार असून, वेळेचीही बचत होवू शकेल.