पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या सहकार्यानं HDFC बँकेच्या सीएसआर निधी मधून CWAS (centre for water and sanitation) ही संस्था पालघर जिल्ह्यातल्या पालघर, डहाणू आणि मोखाडा तालुक्या मधल्या गावांमध्ये पिण्याचं पाणी आणि कचरा व्यवस्थापन सेवा सुधारण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी काम करणार आहे. तसा सामंजस्य करार ही जिल्हा परिषद आणि CWAS मध्ये झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सही करून हा सामंजस्य करार केला. या माध्यमातून 3 वर्षात पालघर मध्ये पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत उपायांवर प्रभावीपणे काम करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : 1973 सालापासून उर्से गावाची एक गाव एक गणपतीची परंपरा आज ही कायम
पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनासाठी मूल्यांकन आणि कृती योजना विकसित करणे, गावांमध्ये पिण्याचे पाणी सुरक्षा प्रकल्प आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे प्रात्यक्षिक ज्यामध्ये समुदाय आणि संस्थांसाठी पावसाचे पाणी साठवणे, उथळ विहिरी/भूजल पुनर्भरण संरचनांद्वारे पुनरुज्जीवित करणे, पावसाच्या पाण्याच्या संचयनाद्वारे साठवण क्षमता वाढवणे, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण, डिजिटल देखरेख यंत्रणा, गावांच्या क्लस्टरमध्ये विलग केलेल्या कचऱ्यासाठी कचरा प्रक्रिया सुविधा, ग्रामपंचायतींच्या देखरेख आणि क्षमता वाढीसाठी सहाय्य, राज्य/जिल्हा स्तरावर स्केल-अपमध्ये समर्थन आणि संसाधन दस्तऐवज विकसित करणे, CWAS ब्लॉक स्तरावर या उपक्रमांसाठी मानव संसाधन नियुक्ती करणे, डेटा संकलन, क्षेत्र भेटी यासारख्या बाबी या करारात समाविष्ट आहेत.