पोलीस अलर्ट मोडवर
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या चिखले गावच्या समुद्र किनारी एक संशयास्पद बोट दिसून आल्याने एकच उडाली. 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान समुद्र किना-यावरील कठडयावर वडकती गावातली 3 मुलं मोबाईलवर गेम खेळत असताना त्यांना चिखले समुद्र किनाऱ्याजवळ गावातील मच्छीमार बोटीजवळ ही अनोळखी संशयास्पद बोट दिसुन आली. ज्यावर हिरव्या रंगाचा आणि पांढ-या रंगाच्या लाईटचा फोकस असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या घटने नंतर आता पोलीस अलर्ट मोड वर असून पोलिसांची पेट्रोलिंग सुरु आहे.
हेही वाचा : क्यू आर कोड मध्ये मिळणार रूग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री
ही बोट, डहाणू भागात असलेल्या बोटींपेक्षा वेगळी आणि जास्त लांबी-रुंदीची असल्याची असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. तसचं बोटीचं समोरील टोक उंच आणि बोटीच्या मागच्या बाजुला एक मोठी कॅबीन असल्याची हि त्यांनी पोलिसांना सांगितलं. ही वेगळी बोट किनाऱ्याजवळ दिसल्याने ही मुले त्या बोटीकडे जावू लागली. ते पाहून ही तिथून निघून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सागरी आणि खाडी पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत पेट्रोलिंगचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मच्छीमार सोसायटयांनाही संशयित बोटीबद्दलची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समुद्रात जाणा-या मच्छीमार बांधवाना काही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा संबंधित वर्णनाची बोट दिसल्यास त्यांनी तातडीने पोलिसांना कळवावे अथवा नियंत्रण कक्षाला कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.