पालघर : पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयासाठी एकूण चार पदे मंजूर करण्यात आली आहेत.
या कार्यालयाचं उदघाटन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य किरण सावे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, महिला बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, प्रकाशक अमोल पाटकर, मनोविकास ग्रंथोत्सव, कार्यालयातील इतर कर्मचारी तसचं वाचक वर्ग आदी उपस्थित होते. पालघर जिल्हयातल्या वाचकांसाठी आवश्यक ती ग्रंथसंपदा या ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात येईल असं यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितलं.
या ग्रंथालयाकडून मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य, शासकीय मध्यवर्ती, विभागीय व जिल्हा ग्रंथालयांची स्थापना, बांधकाम व विकास, शासनमान्य सार्वजनिक / ग्रामपंचायत ग्रंथालयांना शासनमान्यता व सहायक अनुदान यासारख्या योजना राबविण्यात येतात.