पालघर : कोव्हीड-19 चा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्र शासनाकडून परराज्यातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादण्यात आले असून त्याची आज पासून सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र – गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी RTO चेकपोस्ट वर सध्या ही थर्मल तपासणी सुरू आहे. पाच ठिकाणी दहा पथकं तैनात ठेवण्यात आली आहेत. ज्या प्रवाश्यांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह असतील त्यांनाचं राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
डहाणु रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची थर्मल तपासणी सुरु :
तर खबरदारीचा उपाय म्हणून पछिम रेल्वेच्या डहाणु रेल्वे स्थानकावर आजपासून डहाणु नगरपरिषदे कडून येणा-या जाणा-या प्रवाश्यांची थर्मल तपासणी सुरु करण्यात आली आहे.