पालघर : पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 40 हजार 665 इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 51 इतक्या नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यात पालघर ग्रामीण भागातल्या 11 आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 40 रुग्नांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हिड-19 च्या रुग्णाची आतापर्यंतची एकुण संख्या ही 42 हजार 395 वर पोहचली आहे.
त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 27 हजार 748 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 14 हजार 611 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1152 इतक्या रुग्नांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात 169 इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.