पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई क्षेत्रातल्या एका सहा मजली इमारतीच्या लिफ्ट मध्ये फसलेल्या 3 जणांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहर काढलं.
मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या पापडी भागांत असलेल्या एका इमारतीतली लिफ्ट अचानक खराब झाली. त्यामुळे त्या लिफ्ट मध्ये असलेले 3 जण पहिल्या आणि दुसर्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट मध्ये अडकले. त्या 3 जनांपैकी एकाने या घटनेची माहिती अग्निशम विभागाच्या एका अधिका-याला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पोहचून अथक प्रयत्नांनंतर तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढलं.