पालघर : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलिसांना आणि जवानांना आज पालघर मध्ये पोलीस मित्र संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक राजेंद्र कपोते यांच्या संकल्पनेतून शाहिदांचं स्मरण, चिरंतन व्हावं या उद्देशाने आज पालघर स्टेशनजवळ स्मरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ उज्वला काळे, पालघर पोलीस स्टेशन चे निरीक्षक पाटील आणि पोलीस मित्र संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुलक्षण पाटील यांच्या हस्ते शाहिद पोलीस आणि जवानांना दीप प्रज्वलन करून पुष्प वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा राजेश संखे, उदय संखे, महिला आघाडीच्या सपना प्रभू,तुषार पाटील, तुषार घरत,अमोल पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य अनुश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, नगर सेवक चंद्रशेखर वडे, हर्ष सावे, अनेक पोलीस बांधव आणि नागरिक आदी सहभागी झाले होते.