पालघर (नीता चौरे ) : शासन अधिसूचनेच्या नियम १० नुसार पालघरच्या जिल्हाधिकारी यांना पालघर जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलयं.
राज्यात दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा इथून येणाऱ्या प्रवाशांची कोविड-१९ च्या अनुषंगानं तपासणी करण्यासाठी कार्यप्रणाली (SOP) नुसार मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानेनं पालघर जिल्हयातल्या डहाणू, बोईसर, पालघर आणि वसई या रेल्वे स्टेशनवर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा इथून येणाऱ्या प्रवाशांची कोविड-१९ च्या अनुषंगानं तपासणी करण्यासाठी प्रदीप जांभळे पाटील- सहायक आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका (विरार – वसई), चंद्रशेखर जगताप- गट विकास अधिकारी पंचायत समिती (पालघर-बोईसर), स्वाती देशपांडे- मुख्याधिकारी पालघर नगर परिषद, सोहम गुरव- प्रशासकीय अधिकारी डहाणू नगर परिषद यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.