बोईसर : जगभरात दरवर्षी 3 डिसेंबर ला जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. आणि तेव्हा पासून हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती व्हावी या उद्देशानं जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो.
याच जागतिक अपंग दिनाचे औचित्याने राष्ट्रीय सेवाभावी संस्था के.सी.एन क्लब कडून पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या महावितरण च्या कार्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ कर्मचारी दिव्यांग दर्पण पाटील यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम बोईसर मधल्या महावितरण कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय सेवाभावी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदन मिश्रा यांच्या हस्ते ओम साई दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष देवीदास राठोड, दिव्यांग क्रांती ज्योतचे अध्यक्ष विलास भोणे, संजय भानुशाली, अभिजीत जोशी, विनोद रावते, नरेश मोरे यांना ही सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता रुपेश पाटील, पत्रकार रामप्रकाश निराला, केसीएन क्लब पालघर जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, जिल्हा अध्यक्षा संगीता जयस्वाल, जिल्हा महासचिव मनोज यादव , रामनगीना यादव, चंदन झा, राकेश शर्मा, रवींद्र पाल, गुलाब चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.