पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई क्षेत्रातल्या एका प्रतिष्ठित होस्पिटल मध्ये कोरोना वर उपचार घेत असलेल्या महिलेशी होस्पिटलच्याच एका कर्मचार्यांनं छेड़छाड़ करत तिच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची तक्रार केल्यानंतर माणिकपुर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईतली एक महिला कोव्हिड पॉझीटिव्ह असल्यानं तिला उपचारासाठी वसईतल्या एका तिष्ठित होस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या दरम्यान जेव्हा महिला बेशुद्ध झाली तेव्हा होस्पिटलच्याच एका कर्मचार्यांनं तिला नग्न करून तिचे व्हिडिओ बनवण्या बरोबरच फोटो ही काढले.
मग त्यानं ते व्हिडिओ – फोटो महिलेच्या व्हाट्सअप वर पाठवून तिच्या कडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. आणि पैसे न मिळाल्यास ते व्हिडिओ – फोटो सोशल मीडिया वर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर या बाबतची तक्रार पीड़ित महिलेनं माणिकपुर पोलीस ठाण्यात केली. मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.