पालघर / नीता चौरे : केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं बंदची हाक दिली होती. प्रस्तावित वाढवण बंदराला विरोध करत इथल्या काही लोकांनी आपली मुंडन करून तर काही लोकांनी सत्यनारायणाच्या पूजा करून आपला निषेध दर्शविला.
मुंबईतल्या कफपरेड ते डहाणूच्या झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये आज बंद पाळण्यात आला. मच्छीमार संघटना तसचं रिक्षा चालक-मालक संघटनांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला. आणि आपल्या रिक्षा, टमटम बंद ठेवल्या. किनारपट्टी वरील बाजारपेठा आणि मच्छीबाजार देखील आज बंद राहिला. तर या भागातले डायमेकिंग व्यवसायाचं काम देखील लोकांनी बंद ठेवलं होतं.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच लक्ष वेधण्यासाठी आज कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.