पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरणाचा सोहळा मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी एकनाथ शिंदे चे भाषण संपल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठा समोर येवून घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.
वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरणाच्या सोहळयात खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण उपस्थित होते.