पालघर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतल्या शिधापत्रिकेतल्या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. यासाठी रास्त भाव दुकानांतील ई – पॉस उपकरणां मधल्या eKYC आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींगचं प्रमाण वाढविण्यात यावं अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्यात.
त्यानुषंगानं 31 जानेवारी पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचं 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतल्या शिधापत्रिकेतल्या सर्व लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक तात्काळ रास्त भाव धान्य दुकानदारांकडे जमा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
31 जानेवारी पर्यंत आधार सिडीग न झालेल्या लाभाध्याचं अनुज्ञेय धान्य हे पुढच्या महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.