मुंबई / नीता चौर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण भारतात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आज (16 जानेवारी ) पासून पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. या लसीकरण महिमेत मिरा भाईंदर महानगरपालिका यांच्यासह मिररोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलने देखील सहभाग घेतला आहे.
हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. पंकज धमीजा यांच्या मते, लसीकरणाच्या बातमीने लोकांना नक्कीच आशा मिळाली आहे. आणि वोकहार्ट हॉस्पिटल या लसीकरण मोहिमेचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान असून रुग्णांच्या आरोग्यासाठी आम्ही चोवीस तास कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत असं ही ते म्हणाले.
400 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली कोरोना प्रतिबंधात्मक लस
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी आणि कामगार, पोलीस आदी. आणि त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी असणा-या नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे.