पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणु, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, वसई, विक्रमगड आणि वाडा या आठ तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या 2 हजार 718 इतक्या शाळा असून त्यापैकी 1,035 शाळा काल पासून सुरु झाल्या आहेत. तर 22 हजार 367 विद्यार्थी घेतायेत ऑनलाइन शिक्षण घेतायेत.जिल्ह्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या 2 हजार 718 इतक्या शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 1598 शाळा तर इतर व्यवस्थापनांच्या 1120 इतक्या शाळा आहेत. आणि पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गांत जवळपास 94 हजार 252 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 45 हजार 822 इतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली आहे.
जिल्ह्यात 5 वी ते 8 वी पर्यंतच्या वर्गांना शिकवणा-या 1527 शिक्षकांच्या आतापर्यंत कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यात 2 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉजिटिव्ह आल्यात. सध्या जवळपास 57,308 पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी होकार दिला आहे. तर 23,082 पालकांनी मात्र आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिलायं.