पालघर : ग्रामपंचायती मधल्या आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या मदतीनं ग्रामपंचायती मधलं कामकाज सुरळीत चालावं आणि गावातल्या नागरीकांना सर्व सुविधा गाव पातळीवर मिळाव्यात असं शासनाचे धोरण आहे. मात्र सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात बऱ्याच कालावधीपासून केंद्रचालकांना महाऑनलाईन (MOL) च्या प्रशिक्षणा अभावी गावातल्या नागरीकापर्यंत सुविधा पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी पालघर पंचायत समितीच्या सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत उपस्थितांना प्रशिक्षिक प्रवीण यांच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्यात आलं. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडलं. यावेळी प्रत्येक तालुक्यातले विस्तार अधिकारी ( पंचायत ), संगणकीय ज्ञान असणारे, दोन ग्रामविकास अधिकारी, तालुका समन्वयक, तांत्रिक सहायक आणि दोन केंद्रचालक यांना प्रशिक्षण देण्यात आलं.