पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणु तालुक्या मधल्या घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेवजी वैयजलपाडा इथल्या जंगलात दहा लाख रुपयांची मागणी करून त्यावरून सुरजकुमार दुबे या नेव्ही ऑफिसरला पेट्रोल टाकून जाळलं असल्याची जबानी स्वत: सुरजकुमार दुबे यांनी पोलिसांना दिली असली तरी पोलीस तपासात मात्र आणखीन काही वेगळी माहिती समोर आल्याचं पालघर पोलीस अधीक्षकांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
पोलीस तपासात काही वेगळ्या गोष्टी समोर :
पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, 31 तारखेला जेव्हा सुरजकुमार दुबे यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना फोन लावले तेव्हा दुबे यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी तातळीनं झारखंडच्या चहलपुर या स्थानिक पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवल्या बद्दलची तक्रार दिली. आणि त्यांनी याबाबतची माहिती आय.एन.एस अग्रणी कोईमतुर चे कमांडिंग ऑफिसर अशोक राय यांना देखील दिली. त्यानुसार इंडियन नेव्हीच्या नव्ह्ल पोलिसांनी देखील दुबे यांचा तपास सुरु केला. नेव्ही आणि झारखंड पोलिसांकडून तपास सुरु असताना पोलिसांच्या असं लक्षात आलं की, कुटुंबीयांना सूरजकुमार यांचे दोनचं मोबाईल नंबर माहित आहेत. आणि त्यांचा तिसरा मोबाईल नंबर देखील असून त्यावर 1 तारखेला मृत सूरजकुमार यांचा चुलत भाऊ चंदनकुमार यांनी फोन केला त्यावेळी त्यानी योग्य प्रतिसाद दिला नाही. तो 1 फेब्रुवारी ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होता. मग तो 3 रा नंबर देखील बंद झाला. यावरून 30 तारखेला त्यांचं अपहरण झालं त्यावेळी जरी त्यांचे 2 मोबाईल नंबर बंद असले तरी तीसरा मोबाईल नंबर मात्र सुरु होता.
कर्जात बुडाले होते सूरजकुमार :
त्या तिसर्या मोबाईल नंबर वरुन सूरजकुमार यांनी सातत्यानं शेअर मार्केट मध्ये ट्रांजेक्शन केले असून आस्था क्रेडिट कंपनी भोपाळ आणि एंजेल ब्रोकिन मुंबई या दोन कंपन्यामध्ये दोन दिवसांत सातत्यानं खुपसारं क्रेडिट झालं असल्यांचं आणि यात मोठ्या प्रमाणात पैसे शेअर मार्केट मध्ये गेल्याचं पोलीस तपासात दिसून आलं आहे. तसचं सूरजकुमार यांचं बैंक खातं तपासलं असता त्यांनी 2020 मध्ये 1 लाख 43 हजार आणि 1 लाख रुपयांचं कर्ज , आणि २०२१ मध्ये 6 लाखांचं कर्ज पुन्हा घेतल्याचं दिसून आलं. त्यानी त्यांचा बैंक ऑफ़ इंडिया मुंबई च्या खात्यमधुन आतापर्यंत एकुण 8 लाख 43 हजार रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतल्याचं निष्पन्न झालं. या खात्यामधून सातत्यानं शेअर ट्रेडिंग झालं असून शेवटी त्यांचा या खात्यात ३०२ रूपये शिल्लक असल्याचं दिसून आलं. या पगार खात्याच्या व्यतिरिक्त स्टेट बैंक ऑफ़ इंडिया मुंबई मधल्या दुसर्या खात्यातुन 1 फेब्रुवारीला चेन्नईतल्या एका ए.टी.एम मधून 5 हजार रूपये काढले गेले. त्यांच्या या खात्यात फक्त 90 रूपये शिल्लक असल्याचं दिसून आलं. त्यांच्या दोन्ही बैंक खात्यावर मोठ्याप्रमाणात कर्ज असल्याचं दिसून आलं.
सूरजकुमार यांनी त्यांच्या आय.एन.एस.नेव्ही च्या सहका-याकडून देखील 6 लाखांपर्यंत हैण्ड लोन घेतलं होतं. आणि त्यांचे सहकारी त्यांना पैसे परत मागत होते. मात्र त्यानी ते पैसे परत केले नव्हते. सूरजकुमार यांचा 15 जानेवारीला साखरपुडा झाला असून त्यांच्या सासरकडच्या लोकांनी त्याना 9 लाख रूपये बैंक खात्यात आणि इतर स्वरूपात दिले असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसचं त्यानी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट मध्ये पैसा क्रेडिट केला असल्याचं तपासात दिसून आलं.
तपासासाठी तयार करण्यात आलीत 10 पथकं :
या प्रकरणाच्या तपासासाठी आता पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पालघर अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पथकं तयार केली असून प्रत्येक पथकात 1 अधिकारी आणि 10 अंमलदार यांचा समावेश करण्यात आलायं. ह्या टीम विविध पातळीवर तपास करीत आहेत. ही पथकं महाराष्ट्रात आणि इतर राज्यात रवाना करण्यात आल्यात. त्यातल्या 3 टीम ह्या चेन्नईला दाखल झाल्या आहेत . या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७, ३६४,(अ), ३९२, ३४२, ३४ आणि भारतीय हत्यार कायदा 3, 25 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना :
पालघर जिल्ह्यातल्या डहाणु तालुक्या मधल्या घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेवजी वैयजलपाडा इथल्या जंगलात 5 जानेवारीला इंडियन नेव्ही मध्ये लीडिंग सी मैन या पदावर कार्यरत असलेल्या 27 वर्षीय सूरजकुमार दुबे या नेव्ही ऑफिसरचं अपहरण करून तीन अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल टाकुन जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातल्या कोलहु गाव इथले मूळचे रहिवासी असलेले 27 वर्षीय सूरजकुमार मिथिलेश दुबे हे इंडियन नेव्ही मध्ये लीडिंग सी मैन या पदावर कार्यरत होते. सध्या तमिलनाडुतल्या आय.एन.एस.अग्रणी कोईमतुर इथं त्यांची पोस्टिंग होती. यापूर्वी २०१९ पर्यंत त्यांनी आयएनएस मुंबई इथं काम केलं आहे. 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशा 1 महिन्याच्या सुट्टीवर ते मूळ गावी गेले होते. सुट्टी संपल्यानं 30 जानेवारीला ते रांची सकाळी 8 वाजता इथून विमानानं निघाले. त्यानंतर 9 वाजता चेन्नई विमानतळावर ते पोहचले. विमानतळाच्या बाहेर निघताच तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना पिस्टल चा धाक दाखवून त्यांच्या जवळचा 5 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरीनं काढून घेतला. मग एका पांढर्या रंगाच्या एस.यू.व्ही गाडीमध्ये त्याना कोंबलं. आणि त्यांचं अपहरण केलं. त्यांच्याकड़े 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर तीन दिवस त्यांना चेन्नई इथं तीन दिवस डांबून ठेवण्यात आलं. त्या व्यक्तींनी 4 तारखेला त्यांना तिथून काढलं आणि 5 तारखेला सकाळी वेवजी वैयजलपाडा इथल्या जंगलातल्या डोंगरावर आणलं. आणि मग त्या तिघांनी सूरजकुमार यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्याना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला अशी जबानी नेव्ही ऑफिसर दुबे यांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशा अवस्थेत सुरजकुमार हे जीवाच्या आकांतानं पळत वेवजी गाव ते वैयजलपाडा या रत्यावर पोहोचले. 5 तारखेला संध्याकाळी पावनेपाच वाजताच्या दरम्यान जळलेल्या अवस्थेत त्याना काही लोकांनी पाहिलं. लोकानी याबाबतची माहिती घोलवड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यांना डहाणुच्या कॉटेज हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचारासाठी नेलं. मात्र सुरजकुमार हे जास्त भाजले असल्यानं त्याना पुढील उपचारासाठी नेव्हीच्या मुंबई इथल्या आय.एन.एस.अश्विनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
प्रकरणात आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता :
सूरजकुमार यांनी पोलिसांना दिलेली जबानी आणि पोलीस तपासात समोर आलेल्या वेगळ्या गोष्टी यामुळे या नौसैनिक हत्या प्रकरणात आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूंनी तपास करतायेत.