पालघर : पालघर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रविवारी सकाळी चार वाजताच्या दरम्यान पोलिसांना सूचना मिळाली की, पालघर जिल्ह्यातल्या सफाळे मधल्या नंदाडे मध्ये मुसळधार पावसामुळे सखोल भागातली घरे पाण्याखाली गेली आहेत. आणि या मध्ये जवळपास 50 लोकं अडकली आहेत.
अशी माहिती मिळाल्यानंतर सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, उपसरपंच बंटी म्हात्रे, पोलीसमित्र पिंट्या या सर्वांनी तिथं पोहचून पाण्यात अडकलेल्या सर्व लोकांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढलं. आणि त्यांना जवळच्या मराठी शाळेत ठेवण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या मदतीनं या सर्वांच्या चहा पाण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली.