पालघर : मुबंई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातल्या मेंढवण घाटाजवळ एका सिलेंडर ने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. ट्रक चालकाचं ट्रक वरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण घाटात हा ट्रक उलटला. आणि त्यामुळे ट्रकला आग लागली. आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हायड्रोजन वायुची वाहतूक करणारे रिकामे सिलेंडर घेवुन हा ट्रक गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडगर यांनी दिली आहे .
जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या 991 जागांसाठी सरळसेवेनं भरती…..
घटनेची माहिती मिळताच बोईसर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. आणि काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. सुरक्षेच्या दृष्टीनं या मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली होती.