पालघर : पालघर जिल्ह्यातल्या चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक ऑईल टँकर उलटून भीषण अपघात झाला. ऑईल टँकर उलटल्यानं राष्ट्रीय मार्गावर टँकर मधल्या ऑईलची गळती होवू लागल्यानं एकच खळबळ उडाली. नागरिकांना हे ऑईल ज्वलनशील वाटल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होत.
पहा व्हिडिओ :
कासा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी इथल्या एशियन पेट्रोल पंपा समोर मुंबईहून गुजरातच्या दिशेने हायड्रोकार्बन ऑइल घेवून जाणारा टँकर चालकाचं टँकर वरील नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरला जावून धडकला. ज्यामुळे टँकर उलटून त्यातून व्हाइट केमिकल म्हणजेच हायड्रोकार्बन ऑइलची गळती सुरु झाली. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी टँकर ड्रायव्हर दुरका राम याने पोलीसांना माहिती देत सांगितली कि, हे वाईट केमिकल असून सिमेंट तयार करताना या ऑईलचा वापर केला जातो. त्यामुळे हे ज्वलनशील ऑईल नाही. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाने क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु केली. या टँकर मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचं केमिकल भरलेलं होत. मात्र सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जवळपासच्या लोकांनी याला ऑईल समजून डब्ब्यां मध्ये, बादल्यां मध्ये या केमिकलची भराभर सुरु केली.